अंक :- मनोहर ; वर्ष :- एप्रिल १९५१
सन १९२०च्या ऑगस्टमधील गोष्ट. लोकमान्य टिळक दिवंगत झाले होते. मी त्यावेळी धारवाड येथे होतो. ही दु:खद बातमी ज्या दिवशी धारवाडात येऊन थडकली त्याच दिवशी - की त्याच्या दुसऱ्या दिवशी हे मला आज बरोबर आठवत नाही - एक विचित्र हूल गावात उठली. तिकडे एका तळ्याच्या काठावर एक मारुतीचे देवालय होते. त्या मारुतीच्या ओटीतून म्हणे टिळक दिसत होते! जो तो त्या देवळाकडे धाव घेऊ लागला, आणि ‘हो’, ‘हो’, ‘हो’ करीत देवळाबाहेर पडू लागला. ही बातमी ऐकून मीही तारुण्यसुलभ कुतूहलाने प्रेरीत होऊन त्या देवळातील गर्दीत घुसलो आणि मोठ्या प्रयासाने कसाबसा मूर्तीपर्यंत जाऊन पोचलो. पण नवलाची - नव्हे दु:खाची गोष्ट ही, की मारुतीच्या ‘ओटीत’ टिळक मला दिसताच ना! सर्वांना टिळकांचे दर्शन घडते; पण मलाच ते होत नाही, हा माझा कमीपणा इतरांना कळू नये म्हणून मी माझा चेहरा शक्य तितका वरून आनंदी करून देवळाबाहेर पडलो. एकदोन माणसांनी मला दरवाजावर अडवून, ‘‘खरंच काय हो टिळक दिसतात?’असा प्रश्न केला. मी त्यांचे बोलणे ऐकलेच नाही असा बहाणा करून तेथून निसटलो.आणखी काही पावले पुढे गेल्यावर एका बाईने हाच प्रश्न मला कानडीत केला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
chandrashekhar.dahale@gmail.com
5 वर्षांपूर्वीश्री. प्रियोळकर लेख उत्तम आहे. धन्यवाद. असेच अनुभव अनेक वेळा येत असतात. आपण त्यांना शब्दांकित केले. माझ्या माहिती प्रमाणे आपण एक ’ आडनावांचा ईतिहास ’ नांवाचे पुस्तक लिहीले आहे. मी ते बऱ्याच दुकानांमधे शोधले पण ते मिळु शकले नाही. अनेक दुकानदारांना आगाऊ रक्कम देउन सुद्धा ते सध्या उपलब्ध नाही पुढची आवृत्ती निघाल्यावर मिळेल असे सांगण्यात आले. जर ते उपलब्ध असेल तर कुठे मिळेल हे सांगु शकाल का ? वर माझा ईमेल आहे. त्या वर आपण कळवु शकता. धन्यवाद.
parelkarmg
7 वर्षांपूर्वीi am master degree engineer. but I have seen the wall of sant dgyaneshwar. it was not covered at that time in 1960. I even sat on the wall. that wall was FORMERLY out of village. at least it was told to me. if this would had been DONE by a christian saint then you would not have taken the objection or even a doubt. those people who write against it, are they ever studied yogmaya. even Ramkrishna Parmhans had told few of this chamatkars to vivekanand and he himself had written it. You can study his liturature. everything is not ANDHSHRADHAA. SAY THAT YOU ARE NOT CAPABLE OF UNDERSTANDING IT. IT IS LIKE LAUGHING AT JAYANT NARLIKAR BY SOME ILLITERATE MAN.
asiatic
7 वर्षांपूर्वीअप्रतिम. अंधश्रद्धा वाढलेल्या आजच्या समाजात असे हे लेख विचार करायला लावतात. लेखकाची माहिती हवीच.आज प्रियोळकरांसारखा विद्वान कितीजणांना माहीत असेल?
rekhaparalkar
7 वर्षांपूर्वीत्या काळी चमत्कार घडत नाहीत .... हे समजणारी लोकं होती हे वाचून आनंद वाटला. सुंदर लेख ?
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीछान सूचना...नक्कीच अंमलात आणू...
CDKavathekar
7 वर्षांपूर्वीअत्यंत सुंदर व पुस्तकांच्या बद्दल असल्यामुळं फारच आवडला
prakash
7 वर्षांपूर्वीसुंदर लेख, जुन्या माहितीपूर्ण लेखांबद्दल एक सूचना. लेखकाचे नाव tabs मध्ये aahe. तरीही या लेखकाबद्दल दोन ओळी असाव्या.