‘‘मी सिगारेट सोडली-मी सिगारेट सोडली-कायमची सोडली-यापुढे सिगारेट वर्ज्य-प्राण गेला तरी सिगारेट नाही ओढणार-माझा निश्चय कायम-त्रिवार कायम.’’-वास्तविक हे मी कुणालाही सांगत नाही-माझे मलाच सांगतो आहे. हा आजचा प्रसंग नाही-हे अनेकवेळा मी माझे मलाच सांगितले आहे. सिगारेट सोडण्याविषयी मी माझ्या धुरकट मनाला आजपर्यंत जो उपदेश केला आहे तो जर श्लोकबद्ध केला असता तर मनाच्या श्लोकासारखे माझे धुराचे श्लोक घरोघर म्हटले गेले असते. पण चार चरणांचा श्लोक तयार करणे हे माझ्या आवाक्यापलीकडले काम आहे. म्हणून बहुधा हा उपदेश मी गद्यातच करतो-मना, ह्या धुराच्या भोवऱ्यात फसू नकोस. रोज अडीच-तीन रुपयांची राख करणे हे बरे नव्हे. हे सज्जन मना-हा मोह आवर. बाकी मनातल्या मनात देखील माझ्या स्वत:च्या मनाला ‘ मना सज्जना ’ म्हणताना मला लाजल्यासारखे होते. ह्या माझ्या अचपळ मनाची-माझी बालपणापासूनची ओळख आहे-तरी देखील त्या माझ्या मनाला माझा मीच गोंजारीत असतो. वास्तविक हे स्वत:च्या गळ्यात हात घालून आपणच आपल्याला आलिंगन देण्यापैकी आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच छान . नुसता विनोदाचा धूर ! आवडला .
ptipnis
7 वर्षांपूर्वीअप्रतिम... आणि वैज्ञानिक, शारीरिक उलथापालथ जी होते ह्या सिगारेट व्यसनमुक्ती शिवधनुष्य पेलण्यात, ती अगदी खुमासदार पद्धतीने मांडली आहे....??
patwardhanvp
7 वर्षांपूर्वीसभासद झाल्यावर प्रथम लेख वाचला पुलं चा मी सिगारेट सोडली आनंद वाटला . आता अनेक लेख आनंद देऊन जातील ह्यात संशय नाही.
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीपुलंचा 'राहून गेलेल्या गोष्टी' हा लेख पण आपल्या साईटवर आहे. तो पण वाचा. पुल तर तुम्ही वाचलेले आहेतच. आपल्या इथे इतरही भरपूर लेखक तुम्हाला मिळतील ज्यांचे लिखाण वाचून तुम्ही त्यांचेही चाहते व्हाल. वाचा आणि कळवा...
Anand Bhangle
7 वर्षांपूर्वीWow! Reminded me of my olden days of the late fifties and early sixties. I started reading Pu La Deshpande since 1964 after my SSC exam got over and I went to Belgaumm, my native place and joined NavSahitya Vachnalaya.it looked very small from outside but the Twin Brothers who were the owners of this Library were very kind and used to give me 10/12 books on counter. And I think the first book I picked up was either Khogir Bharti or Batatyachi Chawl, and I became a fan of PLD since I picked up the first book of Pu La. Then I started reading all his books one after another. He is my most favorite Author. I am very happy to join "Punashcha" and I am sure that " mazya vachnachi B(h)ook" nakkich bhagwali jail. I am very Thankful to you for making me your member. Anand Bhangle
dattaram
7 वर्षांपूर्वीReality blended in humour.
Sandeep09
7 वर्षांपूर्वीअप्रतिम...
mugdhabhide
7 वर्षांपूर्वीPU. L. SHAILI MASTACH
Arunkumar
7 वर्षांपूर्वीमजेशिर,,,
kiranjoshi
7 वर्षांपूर्वीआत्मारामपंत व विवेकरावांचे आपल्या मनाने ऐकले असते तर आम्हास आपल्या अधिकच्या साहित्य सहवासात अधिक पुलकित वाटले असते. तुमच्या नसण्याची जाणीव अजून टोचू लागते मग.
harshadp
7 वर्षांपूर्वीअप्रतिम!!!!!!!!!! खूप खूप आभार!!!!