साहित्य आणि जगणं या जशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तसंच विज्ञान आणि साहित्य यांचीही फारकत करता येत नाही. त्यामुळेच पुनश्र्चमध्ये काही लेख विज्ञानाविषयीही असावेत असे आम्हाला वाटते. जे ठराविक अंतराने वाचायला मिळतील. पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यातले केवळ २.५ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. उर्वरित सर्व खारे म्हणजे क्षारयुक्त पाणी आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आताच एवढा अक्राळ विक्राळ झालेला आहे की काही वर्षांनी शेतीसाठी खारे पाणी वापरण्याच्या पर्यायाचा विचार करावाच लागणार आहे. अशी वेळ येईल तेव्हा खाऱ्या पाण्यावर शेती करणे कसे शक्य होईल याचा अदमास घेणारा हा लेख- **** अंक - विज्ञानयुग मध्यपूर्व राष्ट्रे तेल उत्पादनाच्या जोरावर चांगली गबर झाली आहेत. म्हणून ती आपले वालुकामय ओसाड प्रदेश लागवडीखाली आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलसिंचन योजना आखीत आहेत. त्यामुळे ताज्या, गोड्या पाण्यावर भलताच ताण पडलेला आहे. क्वासीम आणि सौदी अरेबिया या देशांत 2000 मीटर खोल विहिरीतून पाणी उपसले जाते. इतक्या खोलीवरचे पाणी किती पुरातन असेल याची कल्पना करा! हे साठलेले पाणी ज्या प्रमाणात वापरले जाते, त्या प्रमाणात त्या पाण्याची भरपाई होणे शक्य नाही; हे उघड आहे. अशा परिस्थितीत त्या राष्ट्रांची दृष्टी समुद्राच्या पाण्याकडे जाणे साहजिकच आहे. समुद्राचे पाणी खारे असले तरी साठा अमर्याद आहे. खाऱ्या पाण्यावर शेती करणे ही कल्पना सुरुवातीला कशीशीच वाटण्याचा संभव आहे. कारण या पाण्यातील क्षार पिकांच्या मुळाभोवती जमा होतील व त्यामुळे पिकांची वाढ होणार नाही अशी भीती वाटते. आणखी एक धोका म्हणजे खाऱ्या पाण्याच्या सिंचनामुळे जमिनीतील पाण्याची पातळ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
drsubodhkhare
7 वर्षांपूर्वीहा लेख फार जुना आहे असे वाटते केंव्हाचा आहे? कालबाह्य झाला आहे असे वाटत आहे.
mukundmk
7 वर्षांपूर्वीपूर्वीपुण्याहून सृष्टीज्ञान नावाचे विज्ञानविषयक मासिक निघे. त्यातील लेख खूप माहितीपूर्ण असत.काही तर आजही उपयुक्त ठरणारे.
mukundmk
7 वर्षांपूर्वी2011-12मध्ये चेन्नईजवळ मिंजुर ह्या गावात मी माझ्या एका अभियांत्रिकी प्रकल्पामुळे10-11महिने रहात असताना जवळच्याच समुद्राचे पाणी गोडे करण्याचे तांत्रिक चाचणी-परीक्षण चालू होते. ह्या लेखात, ह्याविषयीचा अथवा तत्सम भारतीय प्रकल्पांचा उल्लेख नाही हे कसे?
kaustubhtamhankar
7 वर्षांपूर्वीया जगात कांहीही अशक्य नाही हेच खरे आहे . तेला पेक्षाही जगायला अन्न लागते आणि ते स्वत: निर्माण केलेले असेल तर त्याला जास्त गोडी असते . इस्त्रइल हा देश कांहीही करू शकतो हे पुन्हा एकदा समजत आहे . प्रगती साठी सुबत्ता नको प्रश्र्न हवेत आणि ते सोडवायची इच्छा हवी हेच खरे .
Awadhut
7 वर्षांपूर्वीविज्ञान व प्रयोगशिलतेने सर्व संकटावर मात करता येते हे सत्य आहे
charushende
7 वर्षांपूर्वीउत्तर माहिती मिळाली. अशाच प्रकारचे संशोधन आपल्या देशातही होणे गरजेचे आहे. आपल्याला प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभला आहे.
aghaisas
7 वर्षांपूर्वीलेखात तांत्रिक भाग खूप जास्त आहे. त्यामुळे रुक्ष आणि कंटाळवाणा वाटला