वसई उर्फ वाजीपूर

पुनश्च    पद्मा मोकाशी    2018-06-20 06:00:40   

दादा कोंडके यांनी ज्यांचं वर्णन 'खडीसाखरेचं जणू या गोटं, वर मधाचं लावलंया बोटं' असं केलं होतं, ती वसईची  सुप्रसिध्द केळी आणि चिमाजी अप्पाने  वेढा घालून जिंकलेला वसईचा किल्ला इतपत माहिती वसईविषयी आपल्याला असतेच. परंतु या गावाचा,परिसराचा  इतिहास खूपच जूना म्हणजे ८००-९०० वर्षांपूर्वीचा आहे आणि तिथं आजवर प्रचंड उलथापलथी झालेल्या आहेत. त्याच्या खुणा आजही इथं आढळून येतात.  वसई ते वाजीपूर  असा या शहराचा प्रवास झालेला प्रवास १९५७ साली प्रसिध्द झाालेल्या या लेखात सांगितलेला आहे. परंतु काळाच्या ओघात वाजीपूरचं पुन्हा वसई कसं झालं  याचा मात्र उल्लेख नाही. पूनश्र्चच्या सदस्यांपैकी कुणाला त्याची माहिती असेल तर त्यांनी या लेखावरील प्रतिक्रियेत ती जरूर लिहावी. ******** ‘वाजीपूर’ हे हल्लीच्या वसईचे नाव आहे. चिमणाजीअप्पाने वसईचा किल्ला सर केल्यावर त्याला हे नाव ठेवले. यापूर्वी इ.स. १५१४ मध्ये बाबोंसा याने या शहराला ‘बाक्से’ असे म्हटलेले आहे. त्या वेळेस ते गुजरातच्या राजाच्या अंमलाखालील उत्कृष्ट बंदर होते. व्यापाराची मोठी उलाढाल तेथे होत असे. इ. स. ११०० च्या आधी वसई हे प्रसिद्ध बंदर नव्हते. ११०० च्या नंतर ते थोडेथोडे पुढे येऊ लागले. इ. स. १२००-१२०९ च्या दरम्यान वसई हे एका प्रांताचे मुख्य शहर असावे. १५९४ मध्ये तेथे फार मोठा व्यापार चालत असावा. ठिकठिकाणाहून येथे गलबते येत. मलबारहून नारळ, सुपारी आणि इतर मसाल्याचे जिन्नस येत. १५८३ मध्ये वसई येथे भात व इतर धान्ये, इमारतीचे लाकूड यांचा मोठा व्यापार चालत होता असा दाखला आढळतो. १७व्या शतकाच्या सुरुवातीला तेथे गलबते बांधण्याचा कारखाना होता. तेथे दगडांचा मोठा व्यापार चाले. मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी गोव्याला वसईहून दगड जात. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


नवल , स्थललेख , पद्मा मोकाशी
स्थल विशेष

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    वसईचा आजपर्यंत बराच इतिहास वाचला गेला पण वाजीपूर नाव पहिल्यांदाच ऐकले.

  2. Vijaykumar Bhawari

      4 वर्षांपूर्वी

    great ..

  3. SachinBhoir

      6 वर्षांपूर्वी

    Bassein आणि वसई ह्या शब्दांचा काही सबंध असावा का? कारण खाडीलगतचा प्रदेश म्हणुन पोर्तुगीजांनी ह्याचे नामकरण Bassein केले असावे? पुढे Bassein चा अपभ्रंश वसई झाला असावा? वाजीपुर म्हणुन कुठे उल्लेख असल्याचे ऐकिवात नाही.

  4. rasika68

      7 वर्षांपूर्वी

    खूपच माहितीपूर्ण लेख



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts