सध्या घराघरांतून लोकांना जेवण नीरस वाटायला लागलंय. जेवणातला आमरस नाहीसा झाल्याचा हा परिणाम. सध्या अनेकांना जीवनाचे रंग उडून गेल्यासारखं वाटतंय. रंगांच्या सतेज केसरी-पिवळ्या सोनसळेची उधळण करणारा आंबा अंतर्धान पावत चाललाय. सध्या वातावरणही गंधहीन होत चाललंय. आंब्याच्या आढीवरून, पेटीवरून किंवा ताटातल्या रसभरीत वाटीवरून येणारा आंब्याचा गोड मादक गंध नाहीसा झालाय. सध्या पोराटोरांच्या शर्टांच्या बाह्या अगदीच फिकट पांढऱ्या दिसायला लागल्या आहेत. आंबे हाणल्यावर बाहीने तोंड पुसून तिच्यावर केशरी फराटे उठवण्याचा प्रकार मागेच थांबलाय. सध्या गृहिणींचे हात लाटण्यांवरून थोडे बाजूला सरल्येत. आंब्याबरोबर रोजच्या अनेकपट पोळ्या बडवाव्या लागत, ते काम आता थांबलंय. सध्या नाक्यानाक्यावरच्या गाई अगदीच ‘गरीब गाई’ झाल्या आहेत. जनरीतीनुसार कचरापेटीच्या बाहेर भिरकावलेले सालीकोयींचे ढिगारे त्यांना उदरभरणासाठी मिळेनासे झाले आहेत. माशांवर तर नुसती माशा मारत बसायचीच पाळी आली आहे. जास्त पिकलेल्या आंब्यांच्या झाडावरच्या कच्च्यापक्क्या फळांना नेम धरण्याचं काम त्यांच्याही हातून सुटत चाललंय. एकूण काय, सगळी चराचर सृष्टीच काहीशी उदास, भकास, रिकामी होऊन जणू काही क्षीण स्वरात विचारतेय, “गेला आंबा कुणीकडे?” काही आठवड्यांपूर्वी चराचरावर राज्य गाजवायला आंबा आला तेव्हा तो कुठून आला असं कोणालाही विचारावं लागलं नाही. आंब्याची हीत तर खरी मजा असते. तो वाजत गाजत येतो आणि लपत छपत जातो. तिकडे झाडांना मोहर यायला सुरुवात झाली की इकडे मनांना मोहर यायला लागतो. अनेक भावी पार्ट्या, मोजवान्या मनात योजल्या जातात. कोकणातल्या नातेवाईकांची आठवण अचानक जागी होते. त्यांच्याविषयीचं प्रेम उफाळून येतं. कोकणातल्या बातम्यांकड ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
rajashreejoshi
7 वर्षांपूर्वीमस्त आहे लेख. मंगला गोडबोलेंचे लिखाण छानच असते
swarupabojewar
7 वर्षांपूर्वीखूपच छान
milindKolatkar
7 वर्षांपूर्वीसंदर्भ पूर्ण असा आहे - मंगला गोडबोले. नवी झुळूक, पान क्र.:१८-२२, १९९४, मेनका प्रकाशन. बाकी मजा आली. दुर्गा भागवतांनतर मंगलाताईंनी आता संमेलनाध्यक्षा व्ह्यायला हवं!
shubhadabodas
7 वर्षांपूर्वीपुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला! दरवर्षी देवगडला उन्हाळ्यात आंब्यात बुडून जातो तरी असं वाटतच
ajaywadke
7 वर्षांपूर्वीमस्त…. लहानपणी सकाळी झोपेतूून उठल्यावर आंब्याच्या अढीकडे धावायचो… ते आठवलं.
आणि आंबा खायचा तर हात बरबटून घेत.. डागांचा विचार न करताच.. आता वर्षभर हा लेख वाचूनच समाधान मानायचं..
jayashreehinge
7 वर्षांपूर्वीव्वा जुने दिवस आठवले.खूप छान लेख आहे.
sugandhadeodhar
7 वर्षांपूर्वीपुढच्या वर्षी आंब्याची पेटी घरी येईपर्यंत रोज एकदातरी हा लेख वाचून आंबे खाल्ल्याचा मानसिक आनंद मनसोक्त लुटावा!!
Shreekant
7 वर्षांपूर्वीआंबा व त्यांच्या खवय्यांचे यथार्थ वर्णन
smanisha
7 वर्षांपूर्वीKhup chhan junya athavani tajya zhalya
drvyankatesh
7 वर्षांपूर्वीखुपच छान पोटभर आमरस खायचे दिवस गेले आता महागडा हापूस आणण म्हणजे दूधाची तहान ताकावर भागविणे आहे
shilpa1952
7 वर्षांपूर्वीमस्त आहे
SMIRA
7 वर्षांपूर्वीसुंदर लेख. खरच जुन्या आठवणी जाग्या झाल्या . येतील का ते दिवस फिरून पुन्हा