लेखक: दत्तू बांदेकर ‘साहेबां’बद्दल दत्तू बांदेकरांना अपार प्रेम आणि आदर. अत्यंत चावरा-बोचरा विनोद करणाऱ्या बांदेकरांची लेखणी अत्र्यांचं गुणवर्णन करताना ‘पांडुरंगाभेटी पुंडलिक’ अशी भक्तिरसपूर्ण होते. साठीनिमित्त साहेबांवर लिहिलेला बांदेकरी शैलीतीलच पण जरा वेगळा लेख... ******** हे आमचे साहेब आज साठ वर्षांचे झाले. ह्या हिंदुस्थानात साठ वर्षे जिवंत राहणे ही सामान्य गोष्ट नाही. आणि फार लोक तशा फंदांत पडतही नाहीत. कारण ‘साठी बुद्धी नाठी’ ह्या म्हणीचा धसका आणि साठीनंतर येणारा दम्याचा ठसका, ह्यांची अनेकांनी दहशत घेतलेली दिसते. साधारणपणे साठीच्या सुमारास दमा, कटिशूल, पित्तप्रकोप, अर्धांग अशा उपाधींना तोंड द्यावे लागते. पण आमचे वज्रदेही साहेब आधीव्याधींपासून पूर्ण अलिप्त आहेत. साहेबांना खोकताना किंवा डोक्यास अमृतांजन चोळताना मी कधीही पाहिलेले नाही. साहेबांना मच्छर चावला तर मच्छर गतप्राण होईल. साहेबांना मलेरिया होणार नाही. मोठमोठे विषारी साप साहेबांच्या अंगाखांद्यावरून सरपटत जीव घेऊन पळाले आहेत. जीवनातील उन्हाळे आणि पावसाळे साहेबांच्या प्रकृतीवर काहीच परिणाम करू शकत नाहीत. साहेबांनी हे तारुण्य शक्तिवर्धक पाक सेवन करून किंवा कायाकल्प यज्ञ करून कमावलं नाही. ही शक्ती ईश्वरानेच त्यांना बहाल केली आहे. महाराष्ट्राच्या ह्या सुपुत्राला नियतीने दिलेली ही देणगी आहे. आपली लेखणी, वाणी, शक्ती, बुद्धिसर्वस्व त्यांनी जनता-जनार्दनाच्या सेवेला वाहिले आहे. साहेबांचा आवाज हा जनतेचा आवाज आहे. साहेबांची वाणी कधी अमृतवाणी तर कधी शापवाणी असते. पण अखेर ती लोकवाणीच! जनतेवर साहेबांची अनन्यसाधारण भक्ती आहे आणि जनतेचेही साहेबांवर अपरंपार प्रेम आहे. अखंड जनतासंपर्कामुळे, साहेब आणि जनता ह्यांच ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ssal
7 वर्षांपूर्वीवाचताना, संवाद होतोय असं वाटतं!
MK046188
7 वर्षांपूर्वीअत्यंत सुंदर। बांदेकरांचे ईतर लेखप्रकाशित करावेत ही विनती।
Sadhana
7 वर्षांपूर्वीअत्रे यांचे नवयुग मधील अग्रलेख प्रसिध्द करणे शक्य आहे का?
Bilwadal
7 वर्षांपूर्वीखूप आवडला... यथार्थ वर्णन...
aniruddhak72
7 वर्षांपूर्वीसुंदर लेख आहे .आचार्य अत्रेंनी देखील दत्तू बांदेकरांवर लेख लिहीले आहेत . ते देखील प्रसिद्ध करावेत .
Meenal Ogale
7 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख.
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीमा संपादक महाशय आपण श्री अत्रे यांचे मराठा मधील लेख प्रसिद्ध करावे
Sharadmani
7 वर्षांपूर्वीअफलातून लेख आहे. स्वतःच्या वरिष्ठांबद्दल असे लिहायला दत्तू बांदेकरच पाहिजे
Suhasthatte
7 वर्षांपूर्वीआचार्य अत्रे दि ग्रेट .
sugandhadeodhar
7 वर्षांपूर्वीउत्कृष्ट शब्दचित्र आणि व्यक्तिचित्र
rajashreejoshi
7 वर्षांपूर्वीहा लेख वाचायला मिळाला यासाठी पुनश्च चे आभार....
kamalakar keshav panchal
7 वर्षांपूर्वीआचार्य अत्रे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त दत्तू बांदेकर यांचा अभिनंदनपर लेख वाचला, अत्यंत भावभक्तीपर असे हे लिखाण असून अत्रेसाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन त्यातून दिसून येते. दत्तू बांदेकरांची तिखट,बोचरी लेखणी त्या वेळच्या भल्या भल्या व्यक्तिमत्वांची खिल्ली उडवणारी असली तरी साहेबांचे गुणगान गाताना कमालीची भावूक झालेली दिसते. बांदेकर वयाने जरी साहेबांपेक्षा मोठे असले तरी साहेबांवरील लेखात ते पुंडलिकाची भूमिका स्वीकारताना दिसतात. अशी स्वामिभक्ती विरळाच. दत्तू बांदेकरांचे लिखाण उपलब्ध असल्यास प्रसिध्द करावे ही विनंती.
dhananjay
7 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर लेख. पुनश्चचे आभार.
sakul
7 वर्षांपूर्वीदत्तू बांदेकर यांचं फारसं काही वाचायला मिळालं नाही. एक जुना लेखसंग्रह आहे. पण त्यातल्या कोणत्याही लेखाहून हा लेख अधिकच भन्नाट. दत्तू बांदेकर यांचं लेखन वाचून अत्रेसाहेबांनाही कसं हसू फुटे आणि ते बांदेकरांच कसं मनापासून कौतुक करीत, याची आठवण शान्ता ज. शेळके यांच्या लेखात आहे. बांदेकरांवर 'विनोदी लेखक' असा शिक्का आहे खरा; पण त्यातला उपहास अतिशय बोचरा आहे. याच लेखातली त्यांची 'मराठी मुलुखात असा एकही मैलाचा दगड नाही, जो साहेबांना वाटेत भेटला नाही आणि असे एकही ठिकाण नाही. जिथे साहेबांनी व्याख्यान झोडले नाही.', 'त्यांचे खरे जिवलग सोबती दोनच. एक सागर आणि दुसरा डोंगर.... विचारमंथनासाठी ते समुद्राकडे धाव घेतात आणि आत्मचिंतनासाठी डोंगराचा आश्रय घेतात. त्यांच्या व्यासंगाला समुद्राची खोली आणि प्रतिभेला पर्वताची उंची प्राप्त झाली आहे याचे कारण हेच!', 'कडक लेख आणि भडक मथळा असा घाट जमल्यावर...' ही वाक्यं काय आहेत!
Dr Nagesh Tekale
7 वर्षांपूर्वीBeautiful article..Shri Bandekar has highlighted true and trusted P K Atre at his sixty.At the end he has given him blessings too not by age but early old age...excellent...