पितृपक्ष

पुनश्च    प्र. के. अत्रे    2018-09-24 18:00:37   

लेखक: आचार्य अत्रे

हा काळ पितृपक्षाचा आहे. त्यामुळे पितरांबरोबरच कावळ्यांचेही महत्त्व आपोआप वाढले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात आचार्य अत्रे आणि त्यांचे सहकारी तुरुंगात असताना अत्र्यांनी कावळ्यांसमोर उस्फूर्त भाषण केले. आचार्य अत्र्यांच्या ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्रातील हा उतारा...

एकोणतीस फेब्रुवारी रोजी मोरारजींच्या वयाला साठ वर्षे पूर्ण होत होती. एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस चार वर्षांनी एकदा म्हणजे जेव्हा ‘लीप वर्ष’ असते तेव्हा येतो. अशा चमत्कारीक दिवशी मोरारजींचा जन्म झालेला असल्याने चार वर्षांनी त्यांचा एकदा वाढदिवस येतो. म्हणजे ज्या दिवशी त्यांना एकसष्टावे वर्षे लागले, त्या दिवशी त्यांचा पंधरावा वाढदिवस होता. मी त्याचा अर्थ असा घेतला की, मोरारजींचे शरीर जरी साठ वर्षांचे झाले असले तरी त्यांची बुद्धी फक्त पंधरा वर्षांच्या पोराची आहे. मुंबईच्या रक्तरंजित हत्याकांडानंतर मोरारजीचा हा वाढदिवस येत असल्याने मोरारजीची जास्तीत जास्त जाहिरात कशी करता येईल याची संधी मुंबईच्या सर्व भांडवलदारांना अनायासेच मिळाली. म्हणुन त्यांनी त्या वाढदिवसांचा विशेष गाजावाजा चालवला होता. मोरारजीच्या सन्मानसमितीत काही मराठी माणसेसुद्धा सामील झालेली बघुन तर मी सर्दच झालो. महाराष्ट्रात अशी माणसे आहेत, म्हणुन तर त्यांचे असे वाटोळे झालेले आहे. मोरारजींचा ‘वाढदिवस’ आपणही तुरुंगात साजरा करावा अशी माझ्या डोक्यात सहज कल्पना आली. अशोक पडबिद्री, दिनू रणदिवे आणि अॅड. वगळ यांच्यापुढे मी ती मांडली. त्यांनाही ती फार पसंत पडली. आम्ही साधारणपणे एक वाजता जेवायला बसत असू. आम्ही जेवायला बसलो की आवारातल्या आंब्याच्या झाडावरचे पाचपन्नास कावळे ‘काव काव’ करीत खाली जमि

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मुक्तस्त्रोत
विनोद

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    मस्त फिरकी घेतलीय .

  2. अरुण दत्तू बांदेकर

      5 वर्षांपूर्वी

    मुंबईतील हुतात्मा स्मारक चौकाजवळ एकदा फेरफटका मारा आणि त्या चौकाचे माहात्म्य जाणून घेण्याच प्रयत्न करा.आचार्य अत्रेसाहेबांनी मोरारजी यांच्यावर तेव्हा तसे का लिहिले याचे उत्तर लगेच मिळेल. ----अरुण दत्तू बांदेकर ,मुंबई.

  3. rohanjagtap

      6 वर्षांपूर्वी

    मोररजींना मराठी महाराष्ट्राबद्दल आकस होता आणि त्यातूनच त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निष्ठुरपणे दडपण्याचा प्रयत्न केला. तरी अत्रे आणि महाराष्ट्रवादी मंडळी त्यांना पुरून उरली! आज महाराष्ट्राविषयी प्रचंड तळमळ असणारे अत्रें सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शोधूनही सापडत नाही! बाकी या लेखातून अत्रेंचे लेखनकौशल्य आणि विनोदबुद्धी यांची पुन्हा नव्याने प्रचिती आली!

  4. ssal

      6 वर्षांपूर्वी

    अजुन वाचायची इच्छा आहे.

  5. hpkher

      6 वर्षांपूर्वी

    मोरारजीनि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते तेंव्हा प्रचंड अप्रिय होते. तथापि असा लेख अत्रे च लिहू शकतात.

  6. Anil95

      6 वर्षांपूर्वी

    मस्त.

  7. rajashreejoshi

      6 वर्षांपूर्वी

    लेख म्हणून छान पण मोरारजी यांच्यावर लिहिले ते फारसे पटले नाही

  8. shilpa1952

      6 वर्षांपूर्वी

    एक विनोदी लेख म्हणून आवडला पण मोरारजी देसाई बद्दल असे लिहिले ते नाही आवडलं अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे

  9. Vijaykumar Kadam

      6 वर्षांपूर्वी

    Apratim sudhanva

  10. mdurugkar

      6 वर्षांपूर्वी

    छानच की..... जुने ते मस्तच ना ।

  11. Vasant y Gadre

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतीम लेख



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts