मराठी-फारसी भाषेची गंमत

पुनश्च    संकलन    2018-10-18 19:00:02   

वाचकांस विनंती. लेख मनोरंजक आहे. लेख जसा वाचत पुढे वाचत जाल तसे तुम्हास बरेच साक्षात्कार होतील. वाचून आनंद घ्यावा. ********** खालील वाक्य वाचा: "मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता. बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाकखान्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेऊन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो." (वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.) ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत. नाही खरे वाटत? बघा मग: दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घर, दालन, कारंजे, फवारा, हौद, रंगमहाल, नाच, संदूकखाना, नर्तकी, बक्षीस, भूक, खाना, मुदपाक खाना, आराम, खिडकी, खुर्ची, बाहेर, बुरुज आणि पलंग. इतके शब्द ह्या वरील वाक्यात फारसी आहेत. आहे ना गंमत ? पण मग हे सगळे झाले तरी कधी?  इसवीसन १२९६ म्हणजे बरोबर आजपासून ७२२ वर्षांपूर्वी फारसी भाषा महाराष्ट्रात आली. फारसी हि आजच्या इराण आणि पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा. हि भाषा इकडे येण्याचे एक कारण होते आणि ते म्हणजे इसवीसन १२९६ ला दिल्लीचा शासक अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर केलेला हल्ला. इसवीसन १३१८ पासून १३४७ पर्यंतचा महाराष्ट्राचा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , ज्ञानरंजन , भाषा , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. स्मिता सुहास

      7 वर्षांपूर्वी

    मराठी फौजा उत्तरेच्या स्वारीवर जात. अडाणी, तुर्की सैन्याशी सरमिसळ होई आणि भाषेत नवीन शब्द घुसते. म्हणूनच आपल्या गणपती आरतीत दास रामाचा असलेल्या समर्थांनी रत्नखरत्नखचित " फरा " ( tiara ) हा शब्द उचलला . तुकोबांच्या " रांडापोरे " मधला पोरे शब्द मूळ फ्रेंच आहे..त्यांच्या काळात तो मराठीत रूळला असावा

  2. manisha.kale

      7 वर्षांपूर्वी

    लेख आवडला पण इथेही उगाचच पुणेरी मराठी भाषेला नाव ठेवायची गरज नव्हती. जशा इतर मराठी बोली भाषा आहे तशीच शुद्ध मराठी भाषा ही पण त्याचाच एक भाग आहे. आता हल्ली जवळ जवळ शुद्ध भाषा वापरणे अत्यंत कमी झाले अथवा बोलताच येत नसल्यामुळे जाता येता शुद्ध मराठी भाषेची खिल्ली उडवतात. आमची शुद्ध मराठी बोली आहे ही fact आहे. तर आम्ही तसेच बोलणार कारण आम्ही कायम तसेच बोलतो. त्यासाठी प्रयत्न करत नाही. आणि मी पुण्याची नाही मुंबईची आहे. बाकी लेख माहिती पूर्ण.

  3. Lucky

      7 वर्षांपूर्वी

    लय भारी

  4. raginipant

      7 वर्षांपूर्वी

    लेखात गंमत कुठे आहार

  5. shubhada.bapat

      7 वर्षांपूर्वी

    नाविन्यपूर्ण

  6. vhatewar

      7 वर्षांपूर्वी

    Zakaas .

  7. mpshah

      7 वर्षांपूर्वी

    Lekh changala aahe pan gammat kothech nahi.

  8. ashutoshk

      7 वर्षांपूर्वी

    वा छान आहे लेख

  9. Rajrashmi

      7 वर्षांपूर्वी

    फार उपयुक्त आहे हा लेख

  10. Pradeep Manohar

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर लेख. वा क्या बात हैं ??

  11. M.R.PANDAO

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय उपयुक्त



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts