अंक - सह्याद्री, ऑगस्ट १९७६ लखनौ कॉंग्रेस म्हणजे लोकमान्यांच्या राजकीय कर्तृत्वाचे परमोच्च शिखर. या अधिवेशनाला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने टिळक पक्षाचे प्रतिनिधी गेले होते. त्यांत साताऱ्याचे प्रख्यात वकील व त्या जिल्ह्यांतील टिळक पक्षाचे नामवंत नेते श्री. नारायण कृष्ण आगाशे हेही होते. श्री. आगाशे हे राजकारणी तसेच चांगले लेखकही होते. त्यांनी आपल्या खाजगी दैनंदिनीत लखनौच्या प्रवासाचे व अधिवेशनाच्या व्यवस्थेचे वर्णन केले आहे. अधिवेशनाचे हे अवांतर किस्से वाचकांना गमतीदार वाटतील. जातावेळचा प्रवास सुखकर झाला व खाण्यापिण्याचे हाल झाले नाहीत. कारण रा. टिळक आमच्याबरोबर होते. परत येताना ते आमच्याबरोबर नव्हते. मग आमचा परामर्श कोण घेणार? सगळ्यांच्याबरोबर नेलेले डबे पालथे झाले. वाटेत जे काही मिळेल त्याच्यावरच गुजराण करणे भाग होते. त्यातल्या त्यात दि. ३१ ला भोपाळच्या स्टेशनवर रा. करंदीकरांच्या ओळखीच्या एका माणसाने, तारेने सूचना पाठविल्यावरून, भात-झुणक्याची व्यवस्था ठेवली होती. त्या वेळी ते पदार्थ किती चांगले लागले म्हणता? असो. परत येताना बहुतेक सर्व मंडळी कल्याणच्या स्टेशनवर उतरली व परभारे साताऱ्यास आली. सोमण, करंदीकर व मी असे तिघेजण मुंबईस गेलो व १ जानेवारीच्या रात्रीच्या गाडीने तिथून दुसऱ्या दिवशी दुपारी येथे दाखल झाली. तिकडे जातेवेळी प्रत्येक कंपार्टमेंटांत सात-आठ माणसे असत. परंतु परत येताना पाचापेक्षा जास्त नव्हती. कारण जाताना एकच स्पेशल होती. येताना ल. मो. आपटे, मंत्री, वकील, रँग्लर परांजपे, एक मद्रासी गृहस्थ व मी असे पाच आसामी होतो. रँग्लर साहेबांनी आपल्या पोटाचे मुळीच हाल होऊ दिले नाहीत. कारण रिफ्रेशमेंट रूममध्ये जाऊन ते खटपट करीत असत. त्यांच्या ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .