भूतलावर स्थिरावलेल्या देवांगना


लेखक – भय्यासाहेब ओंकार एकदा गंधर्व, अप्सरांनी देवेन्द्राला विनंती केली की, “स्वर्गातल्या अमृतपानाचा आणि स्वर्गातल्या नंदनवनाचा आम्हाला अगदी वीट आला आहे. आम्हाला काही काळ पृथ्वीवर वास्तव्य करण्याची परवानगी द्या. तिथल्या सुखदुःखाचा आम्हाला अनुभव घेऊ द्या.” गंधर्व, अप्सरांच्या विनंतीला मान्यता देणे देवेन्द्राला जड वाटू लागले. त्याला चिंता वाटू लागली की या स्वर्गांगना पृथ्वीवरच्या माणसांच्या नजरेस पडल्या तर पृथ्वीवरची माणसे त्यांच्या चरणी लागतील. पृथ्वीवरचे वातावरण या देवांगनांना रुचले तर त्या तिथेच मुक्काम ठोकतील आणि स्वर्गाचा त्यांना विसर पडेल. पण त्या साऱ्यांच्या हट्टापुढे देवेन्द्राचे काही चालेना. अखेर देवन्द्राने त्यांना सांगितले की, “तुम्हाला मी फक्त एक रात्र पृथ्वीवर रहाण्याची संधी देतो. एका कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही पृथ्वीवरच्या कोणत्याही एका रमणीय वनश्रींत विहार करा. मात्र हे ठिकाण पृथ्वीतलावरील मनुष्यवस्तीपासून दूर असायला हवे आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायच्या आत तुम्ही परत स्वर्गात हजर व्हायला पाहिजे. या अटी जर तुम्ही पाळल्या नाहीत तर मात्र माझ्या शापाला तुम्हाला बळी पडावे लागेल.” स्वर्गीच्या गंधर्व, अप्सरांनी ही अट मान्य केली आणि एका कोजागिरीच्या रात्री त्या पृथ्वीवर उतरल्या. चंद्राच्या रुपेरी किरणांनी गिरिशिखरे न्हाऊन निघत होती. पारिजातकाच्या पुष्पांचा परिमल वातावरण धुंद करीत होता. गिरिशिखरावरून उड्या घेत येणारे छोटे निर्झर खालच्या नदीच्या जलप्रवाहात मिसळत होते. स्वर्गाहून मर्त्यलोकीचे ते वातावरण अधिक आकर्षक होते. त्या दरीत ओळीने कितीतरी गुहा होत्या ज्याला जी रुचेल ती गुहा त्याने निवडावी. कुणी नाचू लागले. कुणी गाऊ लागले. कुणी सुरापान करू ला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , माहिती

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts