सुरमयी....


तसं नागपूरातही माझं एक घर आहे. माझं म्हणजे पशाचं. मी ते माझंच समजतो. मी आणि पशा. रूपा. म्हणजे रूम पार्टनर. चार वर्ष आम्ही ईन्जीनिअरींगला बरोबर होतो. छान सूर जुळले. आयुष्यभरासाठी. तसं पशाही म्हणतो. माझंही पुण्यात एक घर आहे. होय बाबा ,तुझंच आहे. पाच वर्षापूर्वी मी माझं घर बदललं. मी राहतो नारायण पेठेत. केळकर रस्ता. रमणबाग चौकात. नवीन घराचा पत्ता सांगितला अन् पशा जाम खुष. "टाॅप लोकेशन." म्हणलं ,पशा तुला माहित्येय ? अरे बाबा , न्यू ईन्ग्लीश स्कूल , रमणबाग. संगीतपंढरी. चला माझी सोय झाली. गेली पंधरा वर्ष पशा आणि बागेश्री डिसेंबरात पुण्यात येतात. थेट नागपूरहून. न चुकता. दर वर्षी. सवाई गंधर्वसाठी. पशाला संगीतातलं काही कळतं ? इंजिनिअरींगला असेपर्यंत तर बिलकुल नाही. नंतर मात्र.. हं.. बागेश्रीशी त्याचं लग्न झालं. आणि पशाचा कानसेन झाला. बागेश्री .. संगीत अलंकार. संगीत जगणारी. "कोमकली म्युझिक " ची डायरेक्टर. गाण्याचे क्लासेस घ्यायची. तिकडे नागपूरात. मला तर वाटायचं, ती पशाशी भांडत असेल, तर ते सुद्धा सुरात असेल. ताल सांभाळून. लय बिघडू न देता. तशी ती दोघं बिलकुल भांडायची नाहीत. एखाद्या तीर्थक्षेत्री जावं तशी ती दोघं पुण्यात येतात. मी रात्री अपरात्री त्यांना, रमणबागेतून गाडीत घालून घरी आणायचो. गेली पाच वर्ष तेही नाही. समोर तर आहे. चालत जातात आणि चालत येतात. संगीताशी आपलं कधी मैत्र जुळलंच नाही. सगळी रागदारी आपल्याला सारखीच. हा साला पशा ... माझ्यासारखाच ढं होता. फिल्मी गाणी ऐकायचो. आणि हास्टेलभर खिंकाळायचो. सूर, ताल,लय काहीही घेणंदेणं नाही. आपल्याच नादात . त्या भिंती बिचार्या अंबुजानं बांधलेल्या, म्हणून टिकल्या. नाहीतर ह्रदयी भेग ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , फेसबुक , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts