सुमारांची सद्दी

पुनश्च    विनय हर्डीकर    2019-01-11 06:00:51   

अंक - कालनिर्णय – सांस्कृतिक दिवाळी अंक २००३ 

ज्या भूप्रदेशाची संस्कृती मुळातच गौरवशाली असते तिला माझी संस्कृती महान आहे असे ढोल बडवून सांगण्याची गरज नसते. आपण अमुक दिन तमुक दिन साजरा करतो आणि प्रत्यक्षात मात्र तो गौरव केवळ त्या दिवसापुरताच राहतो. खुजेपणा हे आपले व्यवच्छेदक लक्षण असले तरी आपण सदैव भ्रामक उंचीच्या समजुतीत राहतो. विनय हर्डीकरांनी आपल्या याच वैचारिक संस्कृतीचा बुरखा एकेकाळी तरातरा फाडला होता. तेव्हा प्रचंड गाजलेला हा लेख आजच्या काळात तर अधिकच कालसुसंगत आहे. सुमारांची सद्दी या शीर्षकाला वाक्प्रचाराचे स्वरूप आणून देणारा हा गाजलेला लेख प्रथमच online...

[ हे शेतकरी संघटनचे बिनीचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे विविध विषयांवरचे लेखन प्रसिद्ध आहे.] Pollution exists already and it is those who point it out who suffer – Henrik Ibsen. गेल्या वर्षी श्री. ना. पेंडसे यांच्याशी गप्पा मारायचा योग आला. नव्वदीचे पेंडसे. नुकतीच ‘घागर रिकामी रे वनमाळी’ ही कादंबरी पॉप्युलरने प्रकाशित केली होती. त्यावर कडी म्हणून की काय स्वतःच्याच ‘जुम्मन’ या दीर्घकथेचं इंग्रजी भाषांतर स्वतः केलेलं. ‘किंग्ज इंग्लिश’ असतं, ‘क्वीन्स इंग्लिश’ असतं, ‘अमेरिकन इंग्लिश’ असतं, तसं म्हटलं ‘पेंडसेज् इंग्लिश ही असू दे,’ म्हणत मोठ्यांदा हसले. त्या भाषांतराची पुढे पटकथा व्हायची होती. ‘या कथेतली शेवटची टोळधाड दाखवणं जुन्या सिनेमातंत्रात शक्य नव्हतं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कालनिर्णय , चिंतन , दीर्घा

प्रतिक्रिया

  1. Tukaram Gaikwad

      3 वर्षांपूर्वी

    धन्यवाद सर... धन्यवाद

  2. Rahul Aphale

      3 वर्षांपूर्वी

    सुस्पष्ट मांडणी, उत्कृष्ट समीक्षा, विचार प्रवर्तक लेख आहे 🙏

  3. Deepak Kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    फार मोठा परिघ आणि पट एका लेखात उलगडून दाखवलाय . पण कुठेही कोणत्याही विषयाला टाळलेय वा अन्याय केलाय असे वाटत नाही फारच बद्धीमान मांडणी . पटली पण ! धन्यवाद !

  4. Jayashree patankar

      4 वर्षांपूर्वी

    खूपच छान. खूप खूप विचार करायला लावणार. एकेक परिच्छेद परत परत वाचावा असा.असेअनेक लेख बहुविध ने द्यावेत.

  5. Rajiv Atre

      4 वर्षांपूर्वी

    Apratim Lekh

  6. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    खुपचं आत्मपरीक्षण करायला लावणारा अभ्यासपूर्ण लेख आहे : ज्ञानी लोकांची समाजात कदर नाही . हे लेखकाने विवेचनातून स्पष्ट करून सांगितले आहे : ज्ञानात भर पडली . आणि लेखाची मांडणीही आवडली .

  7. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर लेख.

  8. ganeshmaali

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख ..." एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के आपण विचार करू शकतो असा विचार करतात आणि उरलेले नव्वद टक्के एकवेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत, हे लोकशाहीचं दारुण वास्तव असतं. " हे वाक्य खूप आवडलं. ह्या सुमार प्रवृतीच्यामुळे आज आपल्या समाजाचं खूप नुकसान झाला आहे आणि आपण काही नवीन आणि ओरिजिनिअल निर्माण नाही करू शकत आहोत. काही लोकं "इंडियन जुगाड" नावाखाली हि Quick फिक्स सोलुशनस जी ह्या सुमारांच्या सुपीक डोक्यातून येतात त्यालाच घेऊन त्याचा उदो उदो करत आहेत.. पण हे आपल्याला खूप पुढे नाही घेऊन जाणार आणि पुढच्या पिढीसाठी आपणअजून मोठे प्रॉब्लेम्स निर्माण करून ठेवतो आहोत.. IT क्रांती जी आपण म्हणतो ती इनफॅक्ट एक प्रकारे आपल्या सुमार प्रवृत्तीचा परिणाम आहे ..आपण फक्त दुसऱ्यांची सेकंड ग्रेड काम करण्यातच खुश राहिलो ..त्यामुळेच आपल्याकडे Windows Apple आणि GE नाही बानू शकले .. (हे मी म्हणतोय ते यात लार्गर लेव्हल काही प्रमाणात आपल्याकडे पण चांगली कामे झाली पण त्यांप्रमाणात नाही ज्या प्रमाणात वेस्ट मध्ये झाली ) आपण आपल्या इतिहासाला आठवण्यातच मग्न राहिलो आणि काही लोकं फक्त प्रगतीच्या नावाखाली वेस्ट चा अंधानुकरण करत राहिले. गरज होती आणि आहे ती चिकित्सक वृत्तीने आपल्या संपन्न संस्कृती आणि इतिहासाकडे बघण्याची आणि प्रामाणिकपणे संशोधन करण्याची.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts