माणसे तोडण्याची कला


अंक : पैंजण, जानेवारी १९७० लेखाबद्दल थोडेसे : फेसबुक आणि व्हाट्सॅपने खोट्या कौतुकाचा अतिरेक करून ग्रेट, ऑसम, फॅट्स्टिक हे शब्द फारच स्वस्त करून टाकले आहेत याचा अनुभव आपण रोज आणि क्षणोक्षणी घेत असतो. एखाद्याने अगदीच सामान्य वाटेल अशी चार ओळींची कविता 'टाकली' तर तिलाही 'डोळ्यांत पाणी आलं' पासून तर 'खूप दिवसांनी काही तरी उत्तम वाचलं' अशा शेकडो प्रतिक्रिया पडतात. याच्या मुळाशी ‘‘उगीच कशाला दुखवा?’’ ही सार्वजनिक भावना असतेच, शिवाय आपण काही तरी लिहू तेव्हा त्याचंही कौतुक व्हावं यासाठी घेतलेली ती सावध भूमिकाही असते.  गंमत म्हणजे, 'कोणाला कशाला दुखवा उगाचच' या भावनेचा सोशल स्फोट आपण आज पाहात असलो तरीही समाजात मात्र ती फार पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. ही प्रवृत्ती घातक असून 'माणसे तोडण्याची कलाही'  किती आवश्यक आहे हे १९७० सालच्या, 'पैंजण' या मासिकातील प्रस्तुत लेखात श्रीराम बोरकर यांनी गंमतीदार उदाहरणे देत सांगितले आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , पैंजण , विनोद

प्रतिक्रिया

  1. Mohan Ranade

      4 वर्षांपूर्वी

    लेख अतिशय सुंदर मात्र सध्याच्या फेसबुक मघ्ये कोणी अशी दया माया दाखवत नाही आदी लिखाणा पेक्षा त्याच्या अन्य बाबी पाहून शेरा येतो असो कालाय तस्मै नमः

  2. Meghashyam Battin

      4 वर्षांपूर्वी

    सत्य स्पष्टपणाने सांगावे भलेही समोरचा थोडा दुखावला गेला तरी चालेल. Best luck next time keep it up या सारख्या वाक्याने समोरच्याला निरोप द्यावा.परत भेटू.

  3. Shreekrushna Manohar

      4 वर्षांपूर्वी

    तरीही काही वेळा नाती जपण्यासाठी कौतुक करावेच लागते . असो लेख वाचनीय आहेच (खरच ).

  4. prashant pachange

      4 वर्षांपूर्वी

    Mala asa vatata ..pratek goshtit jinknyachi spardha mansala asa vagayala lavat asel . Mi swatah tyala apvad nahi ????

  5. asmitaphadke

      5 वर्षांपूर्वी

    अगदी बरोबर लिहिले आहे.

  6. gvom53@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान

  7. rambhide

      6 वर्षांपूर्वी

    "वा! छानचआहे!" चे युग फेसबुकने सुरू केले. लोकांना त्याची सवय लागली. अभिप्रायच जर छान म्हणावे याच अपेक्षेने मागितला असेल तर खरंचच का वाईट बोलून दुखवा? सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर संगीत व नृत्याचे रिएॅलिटी शो चालतात त्यातही हेच करतात. " काय गायलीस तू! लता मंगेशकरांनंतर तूच!" .आशा भोसले परखड बोलतात तर त्यांना जज्ज म्हणून काढून टाकतात. मुलांना देखील नाही ऐकून घ्यायची सवयच नाही. त्यांच्या पालकांना तर त्याहून नाही. हे जर सर्वत्रच आहे तर मग कशासाठी दुखवा?

  8. ShubhadaChaukar

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम। किती ताजा वाटतो आजही। सत्य स्पष्टपणे तरीही समोरच्याचा आदर ठेवून सांगता येते, हेच अनेकांना कळत नाही। त्या त्या क्षेत्रातील जबाबदार माणसांनी नवोदितांना खरा अभिप्राय देने, आवश्यक ते मार्गदर्शन करणे हीही एक जबाबदारी आहे।

  9. Udaykarve

      6 वर्षांपूर्वी

    लेखाचा विषय लक्षवेधक, काही परिच्छेदांची वाक्यरचना भलतीच पकड घेणारी. उदाहरणांची मीमांसा कमी असती तरी चालले असते असं वाटलं. लेख आवडला.

  10. hpkher

      6 वर्षांपूर्वी

    आजच्या समाज माध्यमा मुळे हे प्रश्न आपल्या घरा पर्यंत पोचले आहेत

  11. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    आज हा लेख जास्तच आवश्यक आहे. स्तुतीसुमनांची बरसात, नव्हे नायगाराच सगळीकडून कोसळत असतो. पण उगाच कशाला दुखवायचे ही भावना चिरकालीनच दिसते. नेहमीप्रमाणेच वाचनीय लेखाबद्दल धन्यवाद ???

  12. sakul

      6 वर्षांपूर्वी

    अर्धशतकापूर्वीच्या या लेखातले म्हणणे आजही तसेच लागू पडते; किंबहुना त्याची तीव्रता अधिक आहे. पण काही माध्यमे समाजातील सर्वसामान्यांना सहज उपलब्ध झाल्यावर याची दुसरी बाजूही दिसते. 'उगाच कशाला दुखवायचे' हे जसे एकीकडे, तसेच दुसरीकडे 'ट्रोलिंग'ही दिसते. 'ट्रोलिंग'चा उद्देश 'उगाच कशाला कुणाला सुखवायचे!' असा तर नसेल ना? माणसे दुखवायला माणसे घाबरतात हे खरेच. मी मात्र माणसे दुखवून ठेवण्यात पारंगत आहे. हेतू चांगला असताना कानफाट्या नाव पाडण्यात आल्याने काही माणसे आपोआप दुखावत गेली, एवढे खरे.

  13. Shilpa

      6 वर्षांपूर्वी

    समर्पक लेखन.

  14. Shashi177

      6 वर्षांपूर्वी

    योग्य सल्ला खुसखुशीत भाषेत!



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts