अमर शेख : एक बुलंद आवाज!

पुनश्च    वा. वि. भट    2019-02-09 06:00:01   

अंक- ललित, ऑक्टोबर १९६९ लेखाबद्दल थोडेसे : शाहीर अमर शेख यांनी आपल्या आयुष्यात अनेक भूमिका बजावल्या. क्लीनर,  गिरणी मजूर म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. नंतर कामगार नेते म्हणूनही त्यांनी काम केले. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत  त्यांनी आपले शब्द, सूर अन्‌ आपला पहाडी आवाज यांच्या साहाय्याने महत्त्वाचे योगदान दिले. ग. त्र्यं. माडखोलकर यांनी त्यांचा ‘राष्ट्रीय शाहीर’ या शब्दांत  गौरव केला होता. 'जरी जन्माने मुसलमान मी,अमर शेख भाई | महाराष्ट्र माझे घर ,मराठी माझी आई ' असे म्हणणाऱ्या अमर शेख यांचे २९ ऑगस्ट, १९६९ रोजी निधन झाले.  त्यानंतर वा. वि. भट यांनी ललित मासिकात ऑक्टोबर १९६९ मध्ये लिहिलेला अमर शेखांच्या आयुष्याचा, वाटचालीचा धावता आढावा घेणारा हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** ‘‘चले जाव! ऐतखाऊ उन्मत्त पशुंनो, जाव-जाव-चले जाव!’’ एक काळीसावळी, पुऱ्या उंचीची, सडसडीत बांध्याची मूर्ती हातात डफ घेऊन स्टेजवर उभी. काळ १९४०-४१. स्थळ- परळचे कामगार मैदान. सोगा सोडलेले पांढरेशुभ्र धोतर, अघळपघळ झब्बा, मानेपर्यंत रुळणारे बंडखोर काळेभोर केस-डोळे विलक्षण भावस्पर्शी आणि बोलके. वर उल्लेख केलेल्या गाण्याच्या ओळी जणू एखादा जोराचा शंखनाद हवेत घुमत राहावा तशा सबंध मैदानभर घुमत राहिल्या आणि एका क्षणातच जमलेला हजारोचा प्रेक्षकसमुदाय झपाटल्यासारखा ऐकत आणि पाहातच राहिला. ते गाणे लिहिणाऱ्या आणि गाणाऱ्या व्यक्तीचे नाव होते, अमर शेख. अमर शेख! पाच अक्षरी नाव. मुंबईच्या वर्गजागृत कामगारांचे आंतरिक जिव्हाळ्याचे नाते त्या नावाशी जडले ते तेव्हापासून. त्यामुळेच परवा अपघातात अ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , ललित , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Aparna Ranade

      4 वर्षांपूर्वी

    अमर शेख यांचा लेख वाचायला मिळाला, बहुविधचे चे धन्यवाद छान लेख

  2. Jayashree Gokhale

      4 वर्षांपूर्वी

    नमस्कार.लेख आवडला.अशी माणसे होणे नाही.

  3. Jayashree patankar

      4 वर्षांपूर्वी

    धन्य.धन्य.

  4. Sukanya Khaire

      4 वर्षांपूर्वी

    छान

  5. lahamged@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख

  6. Udaykarve

      7 वर्षांपूर्वी

    एका स्फुलिंगाची कहाणी आज वाचावयास मिळाली. बहुविध चा हा उपक्रम मोकळ्या वेळेचे चीज करतोय. धन्यवाद..!!

  7. asiatic

      7 वर्षांपूर्वी

    फारच छान. विस्मृतीत गेलेल्या शाहीराची आठवण जागवली गेली. अगदी लहानपणी ५८-५९सालात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात ऐकलेली त्यांची प्रचारगीते



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts