प्रतिशब्द योजण्याचे कार्य जर मराठीतील विविध विद्वानांनी केलेच नसते व आपण स्वभाषेबद्दलच्या औदासीन्यामुळे किंवा परभाषेबद्दलच्या वृथा बडिवारामुळे मराठीत हिंदी व इंग्रजी शब्दांचे अनिर्बंध आरोपण चालूच ठेवले असते, तर आज मराठीत नव्वद टक्क्यांहून अधिक परकीय शब्द आले असते.... मराठी भाषिकांच्या आळसामुळे आणि स्वभाषेविषयीच्या अनास्थेमुळे आपण कितीतरी सुंदर मराठी शब्दांना मूठमाती देऊन त्याजागी अनावश्यक हिंदी शब्द स्वीकारतो आहोत याचा हा पाढा वाचला तर आपली आपल्यालाच लाज वाटेल. परंतु नुसती ती वाटून उपयोग काय? आपण आपल्यापुरते जरी चार दोन मराठी शब्दांचा वापर हट्टाने करायचे ठरवले तर भाषेची श्रीमंत टिकून राहील. अंक- अंतर्नाद, फेब्रुवारी २०११ लेखक- सलील कुळकर्णी ‘‘आपण संपर्क साधू इच्छित असलेला क्रमांक सध्या व्यस्त आहे.’’ काही महिन्यांपूर्वी अनपेक्षितपणे मोबाइलवर मराठी भाषेतून अशा सूचना ऐकून कानांवर विश्वासच बसेना. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात मराठी बोलण्यास चिवटपणे विरोध करणाऱ्या चलभाष (मोबाईल) कंपन्यांचे मतपरिवर्तन होऊन, त्या अचानक पोपटाप्रमाणे मराठीत बोलू लागल्या. अडचण एवढीच, की त्यांची मराठीमधील पोपटपंची समजून घेण्यासाठी अनेकदा आपल्याला मराठीचा नाही, तर हिंदीचा शब्दकोश तपासून पाहावा लागतो. ‘व्यस्त’ हा शब्द मी काही वर्षांपूर्वी अशाच कुठल्याशा संदर्भात जेव्हा प्रथम ऐकला, तेव्हा प्रमाण मानले जाणारे मराठी व संस्कृत शब्दकोश उघडून पाहिले होते; पण काहीच उलगडा होत नव्हता. मग कोणीतरी माझ्या सामान्यज्ञानात भर घातली, की इंग्रजीमधील busy या शब्दासाठी हिंदीमध्ये ‘व्यस्त’ हा प्रतिशब्द ठरवला गेला आहे. कारण काय? माहीत नाही. विविध शब्दकोशांत ‘व्यस् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .




















hemant.a.marathe@gmail.com
6 वर्षांपूर्वीअभ्यासपूर्ण लेख आहे मात्र भाषेची मांडणी पाहता हा लेख २०११ मधील वाटत नाही
Jayantgune
7 वर्षांपूर्वीफार सुंदर विवेचन
patankarsushama
7 वर्षांपूर्वीमुद्दे एकदम पटले
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीअहो इथे मुंबईत दोन मराठी माणसे हिंदीत बोलतात, आणि फक्त हिंदीच कशाला इंग्रजी भाषेनी काय कमी आक्रमण केलंय का, आपण सहज सुद्धा जास्तीजास्त मराठी शब्द वापरून मराठी बोलु शकत नाही, आणि ही स्थिती काही फक्त मराठीतच नाहीये काही बाकीच्या भाषांची जवळपास हीच परिस्थिती आहे
vrudeepak
7 वर्षांपूर्वीअतिशय उत्कृष्ट लेख आहे! बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनात खदखदत असलेल्या या प्रश्नाला वाचा फोडली आहे. पण अनेक मराठी मंडळी ह्या प्रश्र्नांबद्दल अनभिज्ञ आहेत किंवा त्याबद्दल उदासीन आहेत. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्याने परप्रांतीयांचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात स्थलांतर झाले व होते आहे. परप्रांतीयांना आपली भाषा बोलायला लावायच्व्हांपासून मराठी भाषकांनी मनोरंजनासाठी हिंदीचा स्वीकार केला तेंव्हापासून मराठीतिल अनेक शब्दप्रयोग, वाकप्रचार आणि म्हणींचा लोप होवू लागला.
Smita
7 वर्षांपूर्वीमराठी भाषे वरील परकीय आक्रमणाचा गंभीर पणे विचार करण्याची वेळ आलेली आहे . सदरच्या लेखामध्ये लेखकाने हिन्दी भाषेच्या आक्रमणाविषयी मत मांडले आहे, परंतु सध्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्याच मुलांचे मराठी ऐकून उबग येतो . "वस्तु भेटली" आणि "वस्तु सापडली" यातला फरकही या मुलांना कळत नाही ...त्यात शिकवणाऱ्या शिक्षिका मराठी भाषा जाणणाऱ्या नसतील तर अवस्था आणखी गंभीर होते ...