भागानगरच्या मौजा


अंक- यशवंत, जून १९३१ लेखाबद्दल थोडेस : मराठी भाषा, साहित्य, साहित्यिक वातावरण शंभर वर्षांपूर्वी जसे होते तसे आता राहिलेले नाही असे आपणांस वाटते का? मग हा लेख वाचा आणि चिंतामुक्त व्हा. साहित्य परिषद-आयोजक यांच्यातील वाद, कवी आणि कवितांची थट्टा, मुख्य मंडपाची शोभा, वक्त्यांच्या नाना तऱ्हा, निवडलेल्या अध्यक्षाबद्दलची नाराजी, काही साहित्यिकांनी संमेलनाला न जाण्यातच मानलेला मोठेपणा, संमेलनाला जाताना प्रवासात होणारे हाल हे सगळे १९३१ साली होते तेच २०१९  साली कायम आहे.  या सगळ्यातून गेली ८८ वर्षे भाषा, साहित्य टिकले तर ते पुढील शंभऱ वर्षेही सहज टिकेल. फार तर तुम्ही आत्ता हा लेख जसा डिजिटल माध्यमात वाचता आहात तसे त्याचे माध्यम बदलेल. शैली, भाषा, वातावरण टिपण्यातली खुमासदार हुषारी, व्यक्तिरेखाचित्रण, साहित्याच्या वर्तुळातील घडामोडी याचा अतिशय मार्मिक मेळ साधत गोपीनाथ तळवलकर यांनी १९३१  साली हैदराबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा रसाळ, खट्याळ आणि खोड्या काढणारा वृत्तांत या लेखात लिहिलेला आहे. भाषेचा डौल आणि शब्दांचा वापर तर अप्रतिमच. ******** साहित्यसेवकांचे प्रस्थान बुधवार ता. ६ मे ३१ रोजी ३-४ च्या सुमारास हैद्राबादकडे जाणार्‍या गाडीची मार्गप्रतीक्षा करीत आम्ही उभे होतो. ऊन म्हणजे मी म्हणत होते. चंद्रदर्शनाने चंद्रकांतमणी पाझरतो त्याप्रमाणे आम्ही सूर्यप्रकाशाने पाझरत होतो. गलितकेश, भीष्माचार्याप्रमाणे  शोभणारे, मध्यमवयस्क, तरणेबांड आणि शैशवाची सरहद्द ओलांडून तारुण्यात प्रविष्ट झालेले असे लहानथोर अनेक साहित्यसेवक आमच्यात होते, एकदोघी विदुषीही होत्या. इतक्यात एक गृहस्थ दादर उतरून हळूहळू आला. त्याचा पोशाख साहेब ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


यशवंत , भाषा , अनुभव कथन , साहित्य जगत

प्रतिक्रिया

  1. shashi50

      7 वर्षांपूर्वी

    फारच फर्मास आहे ! वाचताना खूप गम्मत येत होती !! धन्यवाद !!

  2. ajitpatankar

      7 वर्षांपूर्वी

    अप्रतिम नर्मविनोदी लेख.. प्रसन्न वाटले...



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts