मनस्वी माणूस

पुनश्च    कुमार केतकर    2019-02-18 06:00:32   

पुस्तक : ओसरलेले वादळ – २२ फेब्रुवारी १९९७ महाराष्ट्रातील प्रबोधनाची आणि संवादाची बुद्धिवादी परंपरा अतिशय कळकळीने जोपासणारा एक मनस्वी आणि भला माणूस आपल्यातून गेला आहे. श्री. ग. माजगावकर हे प्रयोगशील प्रबोधनकार होते. त्यांची समाजाला भिडण्याची पद्धत वैचारिक औद्धत्यातून आलेली नव्हती. ते सदैव शिकायला तयार असत. त्यांची स्वतःची स्थूल अशी एक वैचारिक आणि मूल्यात्मक बैठक होती. परंतु ती इतकी लवचिक आणि उदार होती की, ते संघपरिवारापासून नक्षलवाद्यांपर्यंत सर्वांना आपलेसे करू शकत असत. फक्त आपलेसेच नव्हेत, तर लिहिण्यासही प्रवृत्त करीत असत. आज महाराष्ट्राला परिचित असलेले, चाकोरीबाहेर जाऊन विचार व लेखन करू शकणारे कित्येक लेखक, पत्रकार व कार्यकर्ते माजगावकरांच्या कार्यशाळातून बाहेर पडलेले असत. तडफदार तरुणांच्या, नव्या दमाच्या लेखकांच्या, स्वतंत्रपणे समाजात काम करणाऱ्यांच्या, बंडखोर प्रवृत्तीच्या लोकांच्या ते शोधात असत. त्यांना एकाच वेळेस गोळवलकर गुरुजींचे आणि महात्मा गांधींचे, माओ-त्से-तुंग व फिडेल कॅस्ट्रोंचे आणि स्वामी विवेकानंद-लोकमान्य टिळकांचे आकर्षण वाटत असे. सर्व चांगल्या विचारांचे आणि आदर्शांचे मूळ एकच असणार, अशी मनोमन खात्री त्यांना होती. त्यामुळेच गव्हेरा, फिडेल, माओ, हो चि मिन्ह यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या अरुण साधूंना आणि संघपरिवारात वाढलेल्या स. ह. देशपांडे, दत्तप्रसाद दाभोळकर, विनय हर्डीकर, शहाद्याला काम करणाऱ्या कुमार शिराळकर, दिनानाथ मनोहरांना आणि अखंडपणे बंडाच्या मस्तीत असलेल्या अनिल बर्वेंना; वि. ग. कानिटकर, वि. स. वाळिंबे, वा. दा. रानडेसारख्या अभ्यासकांना आणि पुष्पा भावे, वि. भा. देशपांडेंसारख्या समीक्षकांना; दि. बा. मोकाशी आणि विजय तेंडुलकरांन ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी नियतकालिक , समाजकारण , माणूस , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. gbmanjrekar@gmail.com

      6 वर्षांपूर्वी

    मराठी वाचक नव्याने निर्माण झाला पाहिजे तरच श्री.ग.माजगावकर यांच्या 'माणूस' सारखी नियतकालिके पुन्हा निर्माण होतील.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts