अंक - दै. लोकमत ‘सोमवारी आणि गुरूवारी घराचा दरवाजा उघडला जाणार नाही. इतर दिवशी फक्त तीनदा दारावरची बेल वाजवावी. दार उघडले न गेल्यास तुमचे कार्ड आणि भेटीचे कारण देणारा कागद अशा दोन गोष्टी आत सरकवाव्यात, धन्यवाद.’ - अशी पाटी घरावर लावून सगळ्या जगाला आपल्या भेटीचे दरवाजे ठामपणे बंद करणारी, पद्मभूषणसारख्या नागरी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण दिल्लीमध्ये येऊ शकत नाही असे नम्रपणे राष्ट्रपतींना पत्र लिहून जगाच्या दृष्टीने सर्वोच्च वगैरे पुरस्कारांबद्दल (सुद्धा) मन:पूर्वक अनासक्ती प्रामाणिकपणे व्यक्त करणारी आणि जगभरात होणारे तऱ्हेतऱ्हेेचे संगीत महोत्सव, मैफिली, रेकॉर्डिंग, मुलाखती अशा सगळ्या न थकता चालणाऱ्या वर्दळीकडे पाठ फिरवून शांतपणे फक्त आपल्या सूरबहार नावाच्या वाद्याच्या स्वरांसोबत जगू इच्छिणारी ती एक मुलखावेगळी स्त्री. का लिहायचेय तिच्याबद्दल? आणि तेही तºहेतºहेच्या आतषबाजीने, झगमगत्या रोषणाईने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणाºया दिवाळी सारख्या उत्सवी वातावरणात? मिळेल त्या पुस्तकातून, तुरळक मुलाखतींमधून, कुण्या स्नेह्यांनी लिहिलेल्या क्वचितशा लेखांंचा हात धरून अन्नपूर्णादेवी यांच्या आयुष्याच्या डोहात उतरण्याची धडपड करताना मनात सारखा हा प्रश्न येत होता. आजघडीला नव्वदीचे वय. सर्वसामान्यांसाठी जणू कधीच नसलेले मूक अस्तित्व. अगदी शास्त्रीय संगीतावर प्रेम करणाºया रसिकांसाठी सुद्धा त्यांची ओळख साधारण तीनेक संदर्भांनी संपणारी : भारतरत्न पंडित रवीशंकर यांची पहिली पत्नी... नामवंत सरोदवादक अली अकबर खान यांची बहिण... किंवा फार तर फार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची गुरु ! थकलेल्या, जगाच्या नजरेपासून सतत स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या, आजच्या भा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
VinitaYG
6 वर्षांपूर्वीलेख छान !! एका अत्यंत कणखर आणि मानी व्यक्तीमत्वाची ओळख झाली. धन्यवाद. बहुविध ला अनेक शुभेच्छा !!
abcd
6 वर्षांपूर्वीखूप छान
RAMRAY
6 वर्षांपूर्वीसुंदर लेख...
Jayantgune
6 वर्षांपूर्वीअप्रतीम,काळजाला हात घालणारा
spruha
6 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख! विलक्षण सुंदर अनुभव!