लेखकाला वय असतं, लेखनाला नसतं. हे म्हणणं सोप आहे, परंतु वय नसलेलं, ज्याला काळाचा स्पर्श होणार नाही, काळ बदलल्यावरही ज्याचं लेखन संदर्भहिन ठरणार नाही असं लेखन दुर्मिळ असतं. महेश एलकुंचवार हे वर्तनामातलं असं एक नाव. दोन-तिन पिढ्या त्यांच्या लेखनानं भारावल्या, भारावत आहेत. लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर आधी एलकुंचवारांच्या साहित्याच्या सहवासात आणि मग प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात आले. हा सहवास, प्रभाव मुरल्यावर त्यांना आता त्याविषयी काय वाटतं? येत्या २७ तारखेला एलकुंचवारांना महाराष्ट्र शासनातर्फे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यानिमित्त कुंडलकर यांचा हा लेख- ********** अंक - लोकमत जिवंत आणि कार्यरत लेखक वाचकाला आणि आजूबाजूच्या लेखकांना सातत्याने आत्मभान देत असतात. कार्यरत लेखकाचे मन एखाद्या उत्तम सुपीक जमिनीप्रमाणे असते. लेखक लिहिताना फक्त आत्ममग्न मानसिकतेत स्वतः विषयी विचार करत नसतो. तो अश्या अनेक व्यक्तींच्या वतीने जाणीवपूर्वक विचार आणि चिंतन करत असतो ज्या व्यक्तींना आपल्या विचारांना आणि आठवणींना सुसूत्रता देता येत नाही. मनातील विचारांना आणि भूतकाळात घडून गेलेल्या वैयक्तिक आणि सामाजिक स्मृतींना अतिशय पक्क्या आणि योग्य शब्दात मांडता येत नाही अश्या समाजातील लाखो व्यक्तींच्या वतीने लेखक अतिशय संवेदनशीलतेने काम करत असतो. कार्यरत लेखक ज्या भाषेत आणि समाजात नसतात त्या समाजाला जुन्या तत्वांची आणि मूल्यांची सूज येते. अतिशय नकळत असे समाज वैचारिक अधोगतीच्या दिशेने प्रवास करीत राहतात. मी आज टेबलापाशी बसून लिहिताना माझ्यासमोरच्या लाकडी फडताळात महेश एलकुंचवार ह्यांची नाटकांची आणि ललितलेखांची पुस्तके ओळीने समोर उभी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
लोकमत
, भाषा
, अनुभव कथन
, व्यक्ती विशेष
sumitra jadhav
4 वर्षांपूर्वी'मौनराग ' या अनाहत नादनिर्मितीचे जनक महेश आणि त्यांच्याविषयी जणू तीन सप्तकात एखादा गूढ राग ऐकू यावा असा लेख लिहिणारे सचिन हे दोघेही वाचक या नात्याने माझ्या मते राजकुमारच !
Bhagyashree Chalke
4 वर्षांपूर्वीलेखाचे शीर्षक अगदी सार्थ.
gbmanjrekar@gmail.com
6 वर्षांपूर्वीकलात्मकतेचे भान असणारा असा साहित्यिक मराठीत विरळाच !
Chalval1949
6 वर्षांपूर्वीअभ्यासपूर्ण आणि विचाराला चालना देणारा