खरा ‘आलमगीर’ कोण?

पुनश्च    संकलन    2019-03-16 06:00:06   

टोपण नावाने लिहून टोप्या उडवण्याची प्रदीर्घ परंपरा महाराष्ट्रात आहे. कलंदर, तंबी दुराई, ब्रिटिश नंदी ही अलिकडली उदाहरणे तर थोडी जुनी परंतु सदाबहार ठरलेली टोपणनावे म्हणजे ठणठणपाळ आणि सख्या हरी. आलमगीर हे एकेकाळी म्हणजे चाळीसच्या दशकात मराठीत गाजलेले टोपणनाव आज काहीसे विस्मरणात गेले आहे. या नावाने लिहिणारी व्यक्ती कोण होती याबाबत त्याकाळी झालेल्या वादाचा आणि केल्या गेलेल्या दाव्यांचा उहापोह करणारा हा लेख. या नैमित्तिक वादाच्या निमित्ताने प्रस्तुत लेखात केलेली भाष्ये मात्र सार्वकालिक आहेत. ********** अंक- वसुधा ऑगस्ट १९५७ गेल्या महिन्यात जुन्या आणि परंपरागत ‘विविधवृत्तां’चे स्थित्यंतर होऊन त्यातले ‘आलमगीर’ हे आपला स्वतंत्र इतिहास घडविणारे सदर कायमचे बंद झाले. मुळात ‘विविधवृत्तां’त तेवीस वर्षांमागे ‘वृत्ताच्या झरोक्यांतून’ अशा नावाने एक सदर येत असे आणि ते दीर्घकालपर्यंत चालू होते. त्याखाली लेखकाचे टोपणनाव म्हणून ‘आलमगीर’ असे छापलेले असे. विविधवृत्ताच्या एरवी अस्ताव्यस्त, बेंगरूळ स्वरूपात या एका सदराने वाचकांचे लक्ष उत्तरोत्तर आपणाकडे खेचून घेतले आणि अखेर सदराचे मूळ नाव गळून ‘आलमगीर’ हेच सदर झाले. सामाजिक, राजकीय क्षेत्रांतल्या कोणत्याही स्वरूपातल्या दंभाविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध आपला कडक आवाज उठवीत रहाणे हे या सदराचे स्वरूप होते. साऱ्याच अन्यायांविरुद्ध वा दंभाविरुद्ध या सदरातून झुंज घेण्यात आली असे आज म्हणता येणार नाही. त्यात निवड आवड होती. आणि तिला एका व्यक्तीच्या बऱ्यावाईट आवडीनिवडीचे, पक्षनिरपेक्ष आणि एकेकदा परस्परविरुद्ध मतांचे आणि ग्रहपूर्वग्रहांचे स्वरूप उत्तरोत्तर येत गेले आणि ‘आलमगीर’ हे टोपणनाव शेरलॉक होम्सप्रमाणे चालती बो ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , मराठी नियतकालिक , वसुधा

प्रतिक्रिया

  1. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान महितीपुर्ण लेख. खूप मागच्या पिढीतील लेखक आणि त्यांचे लिखाण सध्याच्या पिढीसमोर आणल्याबद्दल धन्यवाद !

  2. ArunBhandare

      6 वर्षांपूर्वी

    सामान्य.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts