मराठीतील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान ज्याप्रमाणे श्री. बाळशास्त्री जांभेकर व श्री. भाऊ महाजन यांच्याकडे जातो, त्याप्रमाणे मराठीतील पहिले नियतकालिक 'दिग्दर्शन' सन १८३७ साली सुरू करण्याचा मानही त्यांच्याकडेच जातो. 'उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा' यांनी मराठी नियतकालिक 'मराठी ज्ञानप्रसारक' सन १८५० साली सुरू केले. हे मासिक १५-१६ वर्षे चालले. इंग्रजी भाषेतील भारदस्त अशा 'व्कार्टर्ली' च्या धरतीवर या मासिकाची आखणी करण्यात आली होती. १८५४ मध्ये भाऊ महाजन यांनीच 'ज्ञानदर्शन' हे त्रैमासिक सुरू केले. त्यानंतर सुप्रसिद्ध 'शाळापत्रक' १८६१ साली आणि १८६७ च्या जुलैपासून 'विविधज्ञानविस्तार' सुरु झाले. मराठी प्रकाशकांचा स्पीड बघा, १८६१ ते १८६७ च्या मध्ये छोटी-मोठी २९ मासिके निघाली होती. ज्ञानोदय(१८४२), तारप्रसारक(१८५०), प्रभोदय(१८५६) व सायंदीपिका ही ख्रिस्तीमतप्रसारक मासिके होती. तर विचारलहरी(१८५२), चंद्रिका(१८५४) व सद्धर्मदीपिका(१८५६) ही तिन्ही मासिके हिंदुधर्माचा प्रसार करून ख्रिस्तीमतप्रचाराला विरोध करीत होती. - संकलन स्रोत - साभार: मराठी नियतकालिकांचा इतिहास (१८३२-१९३७)- रामचंद्र गोविंद कानडे Google Key Words- Dnyanoday, Balshastri Jambhekar, Bhau Mahajan, Ramchandra Govind Kanade, Vividh Dnyanvistar, Dnyandarshan, Sayandipika, Chandri ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .