वाचनकलेचे मर्म


अंक- निबंधमाला 

वर्तमानपत्रे वाचणे हे इंग्रज लोक सकाळी जसा चहा घेतात त्यासारखेच पुष्कळ अंशी होय. म्हणजे अर्धे पोषण, अर्धी करमणूक असाच दोहोंचा प्रकार आहे. शरीराचा निर्वाह होऊन त्याचे यथास्थित पोषण होण्यास जसे चांगले जेवणच पाहिजे त्याप्रमाणेच खरी उपयोगाची अशी विद्वत्ता ज्यास संपादन करणे असेल त्याने मोठमोठ्या नानाविधविषयक ग्रंथांचा उहापोहपूर्वक यथास्थित व्यासंगच केला पाहिजे. हे परिश्रम केल्याने आलेला शीण घटकाभर दूर करण्यास व जगात काय उलाढाली चालल्या आहेत त्या समजण्यास वरील पत्रांचा आदर करणे बरोबर आहे; पण त्यास विद्येच्या शिखरावर बसवून ठेवणे हे अगदी शोभत नाही... ग्रंथवाचन करणे माणसाच्या चौफेर प्रगतीस कसे गरजेचे आहे हे सांगताना मुळात वाचन म्हणजे काय, ते किती प्रकारचे असते, वाचन करावे कसे, त्याचे हेतू काय असू शकतात या मुद्द्यांवर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेला हा विस्तृत लेख. या लेखाचे महत्त्व आजही अबाधित हे यात लेखकाचे द्रष्टेपण कारणीभूत आहे की आपल्या सुशिक्षित समाजाचे दळभद्रीपण, असा प्रश्न जरुर पडतो. अंक- निबंधमाला अथास्य तत्त्वेषु कृतेऽवभासे। समुन्मिमीलेव चिराय चक्षु:१। किरातार्जुनीय. अंक ११ - (१) विषयस्वरूप. (२) व्युत्पत्ति. (३) दोन लाभ. (४) मनोरंजन. (५) इतर प्रकारांशी तुलना. (६) दुसरा लाभ-ज्ञान. (७) विशेषत: निरूपण. (८) मराठीतील ग्रंथसंग्रह. (९) हल्लींच वाचनाचा प्रघात. (१०) त्याची खरी रीत. १. प्रस्तुत अंकांत वाचन म्हणजे वाचण्याची कला याविषयी लिहावयाचे नाही. म्हणजे उत्कृष्ट वाचनाचे जे काही नियम आहेत ते दाखल करून त्यांचा उपयोग सांगणे हा याचा उद्देश नाही.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , समाजकारण , दीर्घा , निबंधमाला
चिंतन

प्रतिक्रिया

  1. Harihar sarang

      4 वर्षांपूर्वी

    वाचनाबाबतीत स्थिती अद्यापि बदललेली नाही। जुन्या मराठीच्या उत्कृष्ट परिवेशात अत्यंत माहितीपूर्ण असा निबंध। असे दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद।

  2. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    वाचन कलेचे मर्म किती छान उलगडून दाखवले आहे

  3. rsrajurkar

      5 वर्षांपूर्वी

    वाचन कलेचे मर्म . डोळेच उघडले . जबरदस्त . बहुविध डिजिटल मीडिया चे धन्यवाद. आज जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी हा लेख वाचण्यासाठी उपलब्ध करून दिला

  4. aruntathe

      6 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर लेख! मला तर फारच आवडला. परंतु असे लेख फेवरेट मध्ये अॅड करता येतील अशी व्यवस्था लवकर लवकर उपलब्ध करून दिल्यास आनंद होईल..



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts