एखाद्या कथेचा, कादंबरीचा शेवट काय असावा याचे आडाखे, अपेक्षा आपण ती वाचताना बांधत असतो. त्या अपेक्षेबरहुकूम नसलेला शेवट पटतोच असे नाही. परंतु कथात्मक साहित्यात सिनेमा-नाटकात शेवट हा अत्यंत महत्वाचा असतो, कारण ती संपते तेव्हा त्या शेवटाचा परिणाम घेऊनच आपण पुढे जात असतो. प्रसिद्ध कथाकार मधुकर धर्मापुरीकर म्हणतात, वाचक वाचताना नेहमीच त्या कथेचे हँडल आपल्या हाती घेत असतो आणि आपण नेऊ त्या दिशेने ती कथा जावी अशी अपेक्षा करत असतो...तर शेवटाचे महत्व आहेच तसे. लहानपणी मुलांना गोष्टी सांगताना 'आणि ते पुढे आनंदाने राहू लागले' असा शेवट केला जातो कारण मुलांमध्ये नकारात्मक विचार रूजू नये असे वाटत असते. मुले मोठी झाल्यावर वास्तववादी साहित्य वाचतात तेव्हा त्यातले शेवट मात्र जगण्यातले दाहक वास्तव मांडताना अनेकदा नकारात्नक झाल्याचे दिसतात. बालपणीच्या अशाच अनुभवातून पुढे प्रौढ साहित्य वाचताना झालेली घालमेल लेखकाने या लेखात सांगितली आहे. त्याची ही तगमग आपल्याला जवळची वाटते कारण आपणही हाच अनुभव घेत असतो. खास 'सत्यकथा' शैलीतील एस. कविमंडन यांचा लेख आहे. सत्यकथेच्या अखेरच्या काळातील एका अंकात आलेला हा लेख आहे. दं.श. कुलकर्णी यांनी १९३३ साली सुरु केलेले 'सत्यकथा' हे मासिक पुढे द.पु, भागवतांकडे गेले, १९४५ नंतर श्री.पु. भागवतांनी त्याचे स्वरुप पूर्ण पालटून नवसाहित्याचे मुखपत्र म्हणून त्यांस लौकिक मिळवून दिला. १९६० नंतर राम पटवर्धन संपादक झाले व सत्यकथा जणू एक चळवळ झाली. विविध कारणांनी १९८२ साली सत्यकथा बंद पडले, परंतु त्यापूर्वी इतिहासात सत्यकथेने स्वतःचे स्थान निश्चित केले होते. ********** अंक – सत्यकथा, सप्टेंबर १९७९ लहानपणी एक सवय झाल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीलेख आवडला . लेखिकेची कथेशी पात्रांशी तादात्म पावण्याची आणि सहसंवेदनाची जाणिव खूपच तरल आहे आपली गृहितकं काही कामाची नाहीत . जीवनात वैविध्य आहे . म्हणूनच कथांमध्ये वेगळेपण आहे .
rsrajurkar
6 वर्षांपूर्वीकथेचा शेवट म्हणजे पुन्हा ए का खऱ्या जीवनाची सुरुवात होणार असते . ?
CDKavathekar
6 वर्षांपूर्वीLast paragraph most touching and makes you think
ravishenolikar
6 वर्षांपूर्वीBrilliant.
Makarand_Joshi
6 वर्षांपूर्वीएस कविमंडन हे टोपणनाव वाटते. याबाबत अधिकची माहिती मिळेल का ?