माझा प्रवास

पुनश्च    स. गं. मालशे    2019-11-22 06:00:06   

चित्रपटांमधून सध्या मराठ्यांच्या आणि पेशव्यांच्या इतिहासाला, पराक्रमांना मोठेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज खरे तर गोडसे भटजींचा प्रवास रूपेरी पडद्यावर आला तर तो जागतिक प्रेक्षकांनाही खेचून घेऊ शकेल असा  मनोरंजक आणि थरारक विषय होऊ शकेल. गोडसे भटजींचे ‘माझा प्रवास’ हे प्रवासवर्णन केवळ मराठीतीलच नव्हे तर कदाचित भारतीय भाषांमधले सर्वश्रेष्ठ प्रवासवर्णन असावे, असे म्हटले जाते. चार पैसे गाठीला लागावे म्हणून ते काकांबरोबर उत्तर हिंदुस्थानात गेले आणि सत्तावनी क्रांतीच्या धोक्यात सापडले. १८ वर्षाच्या तरूणीला खेटून खबदाडात लपून राहण्यापासून तर प्रेतयात्रेतील मडक्यातून स्वैपाकासाठी अग्नी घेण्यापर्यंत अनेक ‘प्रसंग’ त्यांच्यावर गुदरले,त्याचे अतिशय रसाळ वर्णन गोडसेंनी केले आहे. त्यांच्या त्या लिखाणाचे रसग्रहण करणारा सं.गं मालशे यांचा हा लेखही तेवढाच रसपूर्ण आहे. प्रा. डॉ. स. गं. मालशे (जन्म - २४ सप्टेंबर १९२१; मृत्यू - ७ जून १९९२) हे साक्षेपी साहित्यिक, संपादक तथा समीक्षक होते. एस. एन. डी. टी. महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख असणा-या मालशे यांनी फादर स्टिफन्स यांच्या ख्रिस्त पुराणावर विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’आणि ‘मराठी संशोधन पत्रिके’चे ते संपादक होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि मुंबई साहित्य संघाचे अध्यक्ष असणा-या स. गं. मालशे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सहकार्याने ‘समग्र महात्मा फुले’ ग्रथांचे संपादन केले. ‘अध्यापक अत्रे’, ‘ऋणानुबंधाच्या गाठी’, ‘नीरक्षीर’, ‘मराठी वाङ्‌मयाचा इतिहास’ अशी २३ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ********** संख्येच्या दृष् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


स. गं. मालशे , प्रवासवर्णन , दीर्घा , गोडसे भटजी

प्रतिक्रिया

  1. सुधन्वा कुलकर्णी

      6 वर्षांपूर्वी

    आनंदजी ... ९१५२२५५२३५ या क्रमांकावर फोन करा.

  2.   6 वर्षांपूर्वी

    My ID is Anand24. Some time back I have paid RS. 300/-. To read Dirghalekh I have to again pay? If yes, how much? Kind;y let me know. I was having this book some 35 years ago. It is really a fantastic book. Unfortunately I had given the book to one of my friends and now the whereabouts of that book is not known. Same thing happened to my another boo entitled "Jagat Kase Vagave ?". That one is also missing. " mazya sarkhi kahi lok kadhich sudharat nahit hech khare. Thanks Anand Bhangle (Anand24)



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts