कुमार केतकर हे लिहिणारे संपादक आहेत. ते झपाटल्यासारखे लिहित असतात. त्यांच्या अभ्यासाचा आणि विषयांचा आवाकाही अवाक करून टाकतो. मात्र पत्रकारितेत एका उंचीवर पोचलेल्या, विद्वत्तेचा मोठा पल्ला गाठलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीने कधीकाळी 'माहेर' नामक मासिकाला, अगदी मध्यमवर्गीय वाचकाच्या थाटात एखादे तिरकस पत्र लिहिले असेल, अशी कल्पना तरी आपण करु शकतो का? असे एक दुर्मिळ पत्र 'पुनश्च'ला सापडले. केतकरांच्या भाषणांत, बोलण्यात अनेकदा दिसणारा व्यंगात्मक भाव किती पुराणा आहे, याची यावरुन कल्पना येते... बायकांची खरेदी, नटणं-मुरडणं, नवऱ्यावर चालणारी ‘दादागिरी’ असल्या फालतू विषयांवर कंटाळवाणा विनोद करणाऱ्या गोष्टी सोडल्या तर बायकांच्या कथांमध्ये आढळतं एकच-व्यथा! पण ह्या व्यथा कथेतल्या बायकांना जेवढ्या होतात त्यापेक्षा जास्त वाचकाला होतात. जोगळेकर, राजे, कीर, दाते अशा उच्च मध्यमवर्गीय लेखिकांनी गोष्टी लिहायला घेतल्या की एका चौकटीबाहेरच्या विषयांवर त्या लिहूच शकत नाहीत. ‘मातृत्व’, ‘वात्सल्य’, ‘ममता’, ‘आईपण’ असल्या स्वतःवर ढोंगीपणाने लादून घेतलेल्या खोट्या भावनांवर कितीही भावनाविवश होऊन लिहायचं ठरवलं तरी बोथट, भावनाहीन, जीवन जगणाऱ्या या लेखिकांना जीवनाची खोली उमजत नाही— साहजिकच लिहीता पण येत नाही. आणि एकाहून एक क्षुल्लक कथांवर गुणवत्तेप्रमाणे क्रमांक देण्याचा वाचकावर जेव्हा प्रसंग कोसळतो तेव्हा अक्षरशः ‘कथा कुणाची व्यथा कुणा’ अशी परिस्थिती होते. बरं ‘स्त्रियांची दुःख स्त्रियांनाच समजणार.’ --आम्हा पुरुष वाचकांना ते दुःख समजायला सुद्धा मज्जाव! (पण पत्र वाचकांची मागवली आहेत!—फक्त स्त्री-वाचकांची नव्हे) त्यामुळे या पत्राची काय विल्हेवाट लावली जाईल हे लिहितानाच कळून ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
drratnakar16@rediffmail.com
5 वर्षांपूर्वीकेतकरांच्या अकलेला इतरांना नावे ठेवणारा लेख
shripad
5 वर्षांपूर्वीकेतकरांनी काही विधायक केल्याचे कधी ऐकिवात आले नाही. हे त्यांचे पत्र म्हणजे त्यांच्याविषयीच्या सगळ्यांच्या मताला खतपाणीच घालणारे आहे.
Rahulmuli
6 वर्षांपूर्वीपुरुष हा क्षणाचा पति आणि अनंतकाळचा पिता अशा तद्दन फिल्मी व उथळ विधानाची केतकरांकडुन अपेक्षा नव्हती. आज आपल्या अवतीभवती घडणारया घटना पाहिल्या तर पुरुष मरेपर्यंत पुरुषच असतो ( काही सन्माननीय अपवाद सोडले तर)