अंक - मोहिनी, एप्रिल, १९५४
थोडा वेळ विचार करण्यांत घालवून डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली,--
“एकदां, रेल्वेच्या शंटिंगप्रमाणे डबे जोडल्याचा अन् अलग केल्याचा सांखळ्यांचा आवाज ऐकू आला."
"संगम ब्रिज!" श्रीनिवास उद्गारला.
"आणि एकदां कुणाचं तरी लाउडस्पीकरमधून मोठमोठ्यानं चाललेलं भाषण कानांवर पडलं.--" डॉक्टर पुढे म्हणाले.
"शनिवारवाडा!" श्रीनिवास.
"त्यानंतर थोड्या वेळानं घाटांतून चालल्याप्रमाणं मोटारचं गियर बदलल्याचा आवाज आला." -- डॉक्टर.
"कात्रजचा घाट!"-- श्रीनिवास.
"घाटांतील चढण संपून उतार लागल्यानंतर कांहीं वेळानं डावीकडे वळून आमची मोटार खडबडीत रस्त्यावरून धांवायला जगली. त्या प्रवासानं माझं सारं अंग घुसळून निघालं. नंतर एकदम पुन्हा डावीकडे फार मोठ वळण घेऊन थोड्या वेळानं आमची मोटार थांबली."
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .