अंक - मोहिनी, एप्रिल, १९५४
"इथूनच आपल्याला तपास केला पाहिजे." रस्त्याकडे पहात श्रीनिवास उद्गारला, "कालपर्यंत ते लोक या झोंपडींत होते. इथून ते कोणत्या दिशेनं गेले असावेत तें आपल्याला प्रथम ठरवलं पाहिजे. त्यांनीं ती 'हडसन' इथच कुठे तरी टाकून दिली असली पाहिजे. या आडवळणाच्या भागांत ती मोटार कुणाचंहि लक्ष वेधून घेईल, या तीन पाउलवाटांपैकीं ही एक आंत जंगलांत जाते. बाकीच्या उघड्या भागांतून जातात. तेव्हां त्या सोडून ही जंगलांत जाणारी पाउलवाट प्रथम तपासून पाहू. डॉक्टर, तुम्हांला कंटाळा तर येणार नाही ना आमच्याबरोबर यायचा?"
"छेः! उलट कालपासून माझ्या अंगांत एक नवीनच उत्साह संचारला आहे. वाटेल तिथं चला."
आम्ही तिघे त्या पाउलवाटेनं फर्लांग दीड फर्लांग गेलों. श्रीनिवासचं लक्ष वाटेच्या दोन्ही बाजूंना विशेष असल्याचं मला आढळून आलं. अखेरीस पाउलवाटेच्या कडेला तीनचार फुटांवरून त्यानं एक वस्तू उचलून घेतली.
"बरोबर! आपला मार्ग अगदी बरोबर आहे. ही पहा सोन्याची बांगडी!" श्रीनिवासनं एक सोन्याची बांगडी आम्हांला दाखवली. ती त्या तरुण स्त्रीचीच असल्याचं डॉक्टरांनी ओळखलं,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .